स्त्री भ्रूणहत्या
स्त्री भ्रूणहत्या
आई नको मारू मला
जन्माला येऊ दे मला
जग पाहू दे गं मला
आई मारू नको मला
आई मी भावाची बहिण होईल
घरासाठी मी त्याग करील
आजी-आजोबांची नात मी होईल
बोटाला धरून मी फिरायला घेऊन जाईल
शिकून मी मोठी होईन
घराचा उत्कर्ष मी करीन
सावित्रीबाई फुलेंसारखे
स्त्री शिक्षणाचे समाजात
कार्य मी करीन
तिमिरातून तेजाकडे
न्यायचे आहे मला समाजाला
जागणार आहे आई मी
माझ्या वचनाला
आई मी वंशाच
ा दिवा होईल
मी या घराला प्रगतीपथावर
नेऊन या घराण्याच्या
कुळाचा उद्धार मी करील
झाशीच्या राणीसारखी
रणरागिणी मी होईल
समाजातील अनिष्ट प्रथा
मी नष्ट करील
आई-बाबांच्या वृद्धापकाळात
सुशृषा त्यांची मी करेन
आयुष्यभर मी
आई-बाबांसाठी खपेन
वयात येता लग्न
करूनी सासरी मी
लक्ष्मीच्या पावलांनी जाईल
आनंदात सुखात संसार करील
आई जन्माला घाल मला
जन्माला येऊ दे मला
हे जग पाहू दे गं मला
जन्माला येऊ दे मला