STORYMIRROR

काव्य रजनी

Romance

3  

काव्य रजनी

Romance

गजरा

गजरा

1 min
12.6K

माळला सख्या तू गजरा

माझ्या रेशमी केसात

गंधित वासाने खळी

पडली लाजऱ्या गालात


प्रेमाने माळलास तू गजरा

माझ्या बागेतील फुलांचा

मंत्रमुग्ध करीतो तो सुवास

तू माळलेल्या मोगऱ्याचा


बकुळीच्या शुभ्र फुलांचा गजरा

माळलास कौतुकाने केसांत

पाहून ते दृश्य झाडे-वेलीही

खरेच पडले माझ्या रे प्रेमात


मोगऱ्याच्या फुलांचा तो गजरा

मम कुंतलावरी शोभून दिसला

कौतुकाने सख्या तो मज दिधला

किती हर्षाने चेहरा मम खुलला


आपुलकीच्या त्या गजऱ्याने

सारा आसमंत सुगंधीत केला

तुझ्या प्रेमाची माया पाहून

साऱ्या सृष्टीला आनंद झाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance