STORYMIRROR

काव्य रजनी

Others

3  

काव्य रजनी

Others

बाहुली

बाहुली

1 min
11.4K

भातुकलीतली एक बाहुली

सवंगडी निर्जीव तिचे

ना ठाऊक कुणास की

कसे असे जग हे हीचे


कधी होते खोटी आय

बसते बळावर रुसून

नकळत येतात भावना आईच्या

जाते मग निरागस हसून


कधी कुणी मांडीवर घेते

कधी कुणी तिला घास भरविते

कधी अचानक पडते खाली

कधी कुणी प्रेमाचे गोंजरते


सगळ्यांची ती असे लाडकी

सगळ्यांनी तिला डोक्यावर ठेवले

ती तर निर्जीव आहे बाहुली

जिवंत बाहुली ना कुणी ओळखे


जरा करा तिचा खरा मान

खरी बाहुली माते समान जाणं

ती निर्जीव आहे तरी किती लाड

तिला जपा खोला तुमच्या आयुष्याचे गभाड..........


माझी ती एक बाहुली

माझी ती एक सावली

मनाला इतकी भावली

हळूच माझ्या आयुष्यात सरावली


माझी ती एक बाहुली

तिचा एक सारखं ग भास

नट खट कल्पणे पलीकडची

तिला मिळवण्याची माझी आस


माझी ती एक बाहुली

एकांतात ती मनोरंजन

तीच माझी प्रिय मावली

आठवणीतील तू स्वप्न रंजनी


माझी ती एक बाहुली

दिवसभरात सोबतीचा प्रवास

घेऊन मनात तीच राहिली

मग्न राहिले तुझ्या सहवासात


माझी ती एक बाहुली

कशी सांगू तिची बातच न्यारी

सोबत सवंगडी

पण तिची माझी बाहुली प्यारि


Rate this content
Log in