काव्य रजनी

Others

3  

काव्य रजनी

Others

फुलपाखरे

फुलपाखरे

1 min
12.1K


कल्पनेची फुलपाखरे

सप्तरंगात सजली

शब्दरुपी माळेत गुंफुनी

कवितेच्या रूपात दिसली


फुलपाखरू अन नारी

 नात त्यांच सारख

हळूवार स्पर्शाने

दोघे जातात मोहरून

 स्पर्श झाला कठोर

दोघे जातात सुकून

       

फुलांच्या सप्तरंगी दुनियेला

स्वर्गमय करिती फुलपाखरे

हसत,रमत भिरभिरताना

पऱ्यासम दिसती ही पाखरे


किती मोहक सुंदर पाखरे

मधुगंध वेचीत स्वैर विहरतात

फुलांच्या दुनियेला स्वर्गमय करून

वेली- फुलांवर भिरभिरतात


आयुष्य क्षणभंगुर आहे

 हे माहित हे असताना ही

 कसं जगायचं हे फुलपाखरा कडे पाहून शिकावं....

 आव्हाने स्वीकारून पुढे पुढे चालत राहावं ...


 उद्या काय होईल याची

पर्वा न करता डोळे पुसून

 आनंदाने जीवन जगावं ...

फुला प्रमाणे फुलवावे


 फुलपाखरा कडे पाहून

अर्ध राहिलेलं स्वप्न आपलं पूर्ण करावं...

 आयुष्यात खचून न जाता पुढे पुढे सरकत जावे 

 स्वच्छंदी जगायचं हे फुलपाखरा कडे पाहून शिकावे...


Rate this content
Log in