दारिद्र्य
दारिद्र्य
कष्ट करी मि या मातीतला
संघर्ष माझा गरिबीशी
उखडून फेकेल दारिद्र्याला
वचन करते स्वतःशी
दारिद्र्य बापाने,
कस छातीवर वागवल...
कष्टाने त्याच्या गरीबीत,
आमच वीतभर पोटाच भागवल...
मुठभर पीठात मायेन.
दारीद्रय मला कधी दिसून दिल नाही....
पण गरीबीने त्या, बापाला
कधीच हसुन दिल नाही....
दारिद्र्यला घाबरू नकोस
तुला माझी आहे साथ
एकदा गेले दारिद्र्य की
सुखाचे जीवन साथ
कष्टाची भाकर माझी,
कुणापुढे भिक घालणार नाही...
p>
उगवेल नवा सुर्य जिवनात....
दारीद्रय जराही शेष उरणार नाही....
असे वाटते आता
दारिद्रय सोडणार नाही मला
दारिद्र्याच्या लाटांनी
घेरले आहे मला
दारिद्र्य हा एक वेळ
त्याचाशी घालुन मेळ
जीवनाच्या आनंदाचा
खेळु नवा एक खेळ
दारिद्र्याला दोन हात करता
करता सरळ हो सर्व जिवन
गरिबाच्या आयुष्यातील कधी
संपल हो एकदाची वनवन
दारिद्र्य जाऊन
समृद्धी येईल
आपल्यापासून दारिद्र्याला दूर नेईल
आपल्या पासून दरिद्र्याला दुर नेईल