हुंडाबळी ती
हुंडाबळी ती
मुलींकडुन आतल्या हाताने
पैशाची मागणी केली जाते
सतत मागूनही अपयश येता
शेवटी लेक हुंडाबळी ठरते
हुंड्याविरुदध आहे सांगून
उलट्या हाताने हुंडा घेतात
मुखवटाधारी चेहरे असेच
समाजात मानाने वावरतात
हुंडा स्विकारीत नाही म्हणत
हुंड्यापायी छळून घेतात
हकनाक बळी पडते तेव्हा
असली चेहरे उघडे पडतात
मुखवटाधारी लोकांचा वेळीच
मुखवटा उतरावयाचा असतो
लेकिला त्रास होऊ नये म्हणून
गप्प बसण्यात अर्थ नसतो-