Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

काव्य रजनी

Romance


3  

काव्य रजनी

Romance


आयुष्य तुझ्या नावावर

आयुष्य तुझ्या नावावर

2 mins 11.6K 2 mins 11.6K

आयुष्य तुझ्या नावावर झाले

मनातले विचारांचे वादळ 

आता थोपवणार आहे 

माझं सारं आयुष्य 

तुझ्या नावावर करणार आहे


आयुष्य तुझ्या नावावर झाले

मला बघता असा हरवू नकोस

मीच तुझी सखी खरी रे

हे तू कधीच विसरू नकोस


आयुष्य तुझ्या नावावर झाले

जीवनाच्या वेलीवरचे फुल

साक्ष देते सहजीवनाची

साथ आहे जीवनाची


आयुष्य तुझ्या नावावर झाले

कशी ते मी सख्या विसरू

काळजाचा ठाव तूच

हात प्रेमासाठी कशाला पसरु


आयुष्य तुझ्या नावावर झाले

माझे जगणेच राहून गेले,

पण जगताना तू असतोस आसपास 

मग माझा मी श्वास घ्यायचे च राहून गेले


आयुष्य तुझ्या नावावर झाले

एका क्षणातच मी केले

विश्वास होता म्हणूनच

सख्यारे आई वडील सोडले


आयुष्य तुझ्या नावावर 

करूनच झाले मी शांत

त्यांची उणीव भासत नाही

तुझ्या प्रेमानं केले निवांत


आयुष्य तुझ्या नावावर

केले होते मीच

काळजावर तुझं नाव

कोरले होते मीच


आयुष्य तुझ्या नावावर

हे विसरणार नाही

दे वचन मला

सोडून जाणार नाही


आयुष्य तुझ्या नावावर केले

मग कसली होती रे भीती

पदोपदी तुलाच स्मरले

हीच होती माझी प्रचिती


आयुष्य तुझ्या नावावर

सात जन्मापासून आहे

प्रत्येक जन्म तुझ्यासाठी

जगणे मला प्रिय आहे


आयुष्य तुझ्या नावावर

करून भूतकाळ विसरले

चंद्र चांदण्यांच्या सौम्य

प्रकाशामध्ये मी शहारले


आयुष्य तुझ्या नावावर

बंधन तुझीच फक्त प्रेमानं बांध

फक्त तू म्हणावं थांब

न मी ते ऐकावं असं बंधन बांध


आयुष्य तुझ्या नावावर

सात जन्म जरी असले

जीव लावला सख्या तुला

सतत तुझेच रूप दिसले


आयुष्य तुझ्या नावावर

सात बारा प्रमाणे गं

जीव ओतला तुझ्यात सारा

स्वतःचे भान ना राहिले


आयुष्य तुझ्या नावावर

जगाला ओरडून सांगावे

असे काही आपले प्रेम नाही

एकांतात देते प्रेमाची ग्वाही


आयुष्य तुझ्या नावावर

कधीच केले रे मी

बंधनात तुझ्या गुरफटून

अधीन झाले रे मी


आयुष्य तुझ्या नावावर

करोनी तूच हरल्या त्या वेदना

माहेर सोडूनी येताना

झाल्या किती यातना


आयुष्य तुझ्या नावावर करताना

मी गालातल्या गालात हसले होते

भविष्याचे स्वप्न पाहात असताना

माझा भूतकाळ मी विसरले होते....


आयुष्य तुझ्या नावावर करून

तुझ्यात विलीन झाले

प्रतिबिंब तुझे पाहिले

मुख कमळ उमलले


आयुष्य तुझ्या नावावर

तरी नकळत मन हे बावरले

मिठीत सख्या तुझ्या असताना

मन माझे नाही सावरले


आयुष्य तुझ्या नावावर केले

काळजात बसून रहा

आपसूक नाते जुळले

तरीही प्रेमात विश्वास हवा........

तरीही प्रेमात विश्वास हवा.......


Rate this content
Log in

More marathi poem from काव्य रजनी

Similar marathi poem from Romance