वेश्या
वेश्या


वेश्या
पोटाची भूक आणि
आगीची झळ
दोन्ही एकत्र करून
वैश्या सोसते ती कळ....
वेश्या असली ती जरी
आहे जगण्याचा तीला अधिकार
आपणचं समंजसपणे आता
द्यायला हवा तीला आधार
वैश्या असली तरी
सुधा एक बाई आहे
तिला अपवित्र म्हणून
आपल्याला काय ज्ञान आहे...
बायका कितीही वैश्या झाल्या
तरी कमी पडेल वासनेची नजर
कितीही स्वतःला सीता केले
तरी गाव गुंड करणार कहर
वेश्या आहे म्हणून
जगाचा आहे समतोल,
नाहीतर जग कधीच
झाले असते माती मोल ,,
पोटाची खळगी भरन्या
वैश्य आली उदयाला
पण तिचा ही अधिकार आहे,,
माणूस म्हणून जगायला,,
वैश्या करते देहविक्री
करते स्वतःचे शरीर घान
लाजत नाही स्वकष्टाने
ठेवते ती सगळ्यांचा मान
करते देह लोकांच्या हवाली
अबला असली तरी आहे नारी
कितीही मनाविरुद्ध राहिली
वैश्या लाही असते भावना सारी..
काय व्यावसय आहे त्यांचा
रोज रोज नवीन तान
अनोळखी माणूस भेटते
धुळीला मिळतो स्त्रीचा मान
समाजात आम्हा
वेश्या म्हणती
तुटल्या जीवाच्या व्यथा
कोण जाणती?
लचके तोडले तिच्या शरीराचे
तरीही ती निपचिपच आहे
माणूस म्हणून जगणे
का तिच्या प्राक्तनात नाही?
काटेरी आहे जिवन तरी
निखळ मनोरंजक आहे हसणं.....
बदनाम आहे गल्ली जरी
असतात तेथे ही माणसं .....
देहाचा बाजार
आजही नव्याने मांडला जात आहे
नेमके हेच कळत नाही
*तो* नेमका कशाची
वाट पाहत आहे
स्वप्न विसरूनी मज़बूरी
म्हणून जगते एक वैश्या.....
तिचे दुःख,तिचे आयुष्य तिलाच माहित,
शब्दात तरी गुंफनार कश्या?
मज वाटते हे नेहेमी
का करी त्या वैश्य व्यावसाय
करा कष्ट नी मोल मजुरी
जीवनाला अर्थ मिळवाय...
असेच सदैव नसते
समजुन सांगा मनाला,
वेश्याव्यवसाय काहीजणी
निवडतात विनिकष्ट मौज करण्याला
स्त्री च आहे ती वैश्य
तिचा अनमोल काय आहे
आहे जगात सर्वत्र
धन रोकडे नी काय.....
वेश्या काही प्रत्येकच
लाचार नसते पोटासाठी,
काहीजणी धावतात
छानछोकीवर पैसे ऊधळण्यापाठी
काळीज फाटते
आलिंगन देता
वैश्या बदनाम होते
स्वतःस विकता।
तरुण मुलेही आता बिघडली
जागोजागी ही गल्ली झाली
भावना मग पायाखाली दडल्या
वैश्या मग उपभोगी वस्तू झाली
का करते वैश्याा देहविक्री
कधी कुणी जाणिले काय
नेहेमीच शरीर आणि पैसा
हे गणित कुणाला समजलंय काय
रंभा ,मेनका,उर्वशी ही होत्या
त्या तर इंद्र दरबारी नृत्यांगना
युगे युगे ही सरली आता आली
वैश्य ही कामवासना ....
कुणास ठाऊक कोण चांगली
कुणास ठाऊक कुणी निर्मिली
वैश्य पण एक स्त्रीचं आहे
कुणा वाटली वासनेची बाहुली
वेश्या म्हणुनी हिणवीशी तिजला
घ्यावा कधी तिच्याही मनाचा वेध..
असे कसे दुटप्पी वागणे मानवाचे
निसर्गाने ना कधीच केला भेद...
एकाच रस्त्याच्या अलीकडे पलीकडे
दोन वेगळे विश्व वसतात....
एकाला ना बदनामी ची धास्ती
दुसरीकडे इज्जतीला जपतात...
दृष्टीकोन हवा बदलायला
गृहीत धरावे ना कोणीच.....
वेश्या ती असली तरीही
तिच्या लेकरांची ती आईच.....
तिच्या लेकरांची ती आईच.....