किती भोळा गं भोळा माझा साजणा
किती भोळा गं भोळा माझा साजणा
उमगून घे ना प्रीतीचा हा बहाणा
किती भोळा गं भोळा माझा सजणा।।धृ।।
करूनी थकले सारे इशारे
सभोवताली प्रीतीचे वारे
इशाऱ्याचा अर्थ थोडा, थोडा तरी उमजून घे ना
किती भोळा गं भोळा माझा सजणा।।१।।
मन तुजसी पहाया भुलले
प्रीतीचे अबोल मौन हे खुलले
सांज प्रीतीचा गारवा, गारवा मला सहावेना
किती भोळा गं भोळा माझा साजणा।।२।।
पसरली लाज अशी ही गाली
जीव नुसताच वरती-खाली
झुरला आसमंत सारा,सारा साधूनीया निशाणा
किती भोळा गं भोळा माझा साजणा।।३।।
तु खळखळ झरा वाहणारा
मी निवांत नदीचा किनारा
माझ्या निरागस प्रेमा, प्रेमा साद एक दे ना
किती भोळा गं भोळा माझा साजणा।।४।।

