तुझाच हा ध्यास...!
तुझाच हा ध्यास...!
राहायलास का उरी,
मला कवटाळूनी...!
देहभान विसरुनी,
तुझाचं ध्यास मनी...!
ओल्या केसांचा पिंगा,
त्यात मोगरा दरवळला...!
तुझ्या आठवणीने,
प्रितीचा फुलौरा फुलला...!
घे आता उंच भरारी,
दाही दिशा दरवळल्या...!
ठेव उराशी बिलगुन,
मोगरा हर्षाने फुलला....!
कोण, काय, कुठे,
शोधू नको आता....!
मनाचा गुंता सोडव,
पुढतीचं जावे आता...!
मागे वळूनी पाहता,
आठवण रुजते मनात...!
त्यागूनी ती बंधने,
घे उंच भरारी क्षणात...!