माय मराठी
माय मराठी
माय मराठीची गोडी लई अविट वाटते....
तवां वावरात माया तिफनं चालते....
पाय अनवानी माया भाऊ शेत नांगरते....
शेत नांगरते तो तिफन हाकते....
मराठी मायबोली माय वराडी बोलते....
तवा माया वावरा मंधी जवारी पिकते....
जवारीच्या संगतीले गहू हरभऱ्या ही येते....
मायं माया वावरामंधी निंधन घालते....
भाकरीचा घास लेकरा पोटभर देते....
बाप राबतो कष्टान ईया तिफन घेऊन....
माय देते त्याले साथ वांग टमाटर पेरून....
माया अंगनी ग बाई सडा सारवनं शेनाचं....
आंब्याच्या पारावरती गान राघू व मैनेचं....
डोईवर सूर्य जवां येते तवा बाप माया जागा होते....
माया गाईचं वासरू तवा रंगामधी येते....
तवा माय मराठी कशी गालात हासते....
माया बैलाची जोडी ही डोल्यात भरते....
कसे गोजिरे रूप महादेवासनी शोभते....
माय मराठीला मग हर्षही होते....
तवा माया घरी माय वराडी पानी ही भरते....
