STORYMIRROR

Jagdish Sawar

Classics

4  

Jagdish Sawar

Classics

आई!

आई!

1 min
23.3K

’आई!’ म्हणोनी कोणी। आईस हाक मारी

ती हाक येई कानी। मज होय शोककारी

नोहेच हाक माते। मारी कुणी कुठारी

आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी!

ही न्यूनता सुखाची। चित्ता सदा विदारी

स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी


चारा मुखी पिलांच्या। चिमणी हळूच देई

गोठ्यात वासरांना। या चाटतात गाई

वात्सल्य हे पशूंचे। मी रोज रोज पाही

पाहून अंतरात्मा। व्याकूळ मात्र होई!

वात्सल्य माऊलीचे। आम्हा जगात नाही

दुर्भाग्य याविना का ? आम्हास नाही आई


शाळेतुनी घराला। येता धरील पोटी

काढून ठेवलेला। घालील घास ओठी

उष्ट्या तशा मुखाच्या। धावेल चुंबना ती

कोणी तुझ्याविना गे। का या करील गोष्टी?

तूझ्याविना न कोणी। लावील सांजवाती

सांगेल ना म्हणाया। आम्हा ’शुभं करोति’


ताईस या कशाची। जाणीव काही नाही

त्या सान बालिकेला। समजे न यात काही

पाणी तरारताना। नेत्रात बावरे ही

ऐकूनि घे परंतू। ’आम्हास नाही आई’

सांगे तसे मुलींना। ’आम्हास नाही आई’

ते बोल येति कानी। ’आम्हास नाहि आई’


आई! तुझ्याच ठायी। सामर्थ्य नंदिनीचे

माहेर मंगलाचे। अद्वैत तापसांचे

गांभीर्य सागराचे। औदार्य या धरेचे

नेत्रात तेज नाचे। त्या शांत चंद्रिकेचे

वात्सल्य गाढ पोटी। त्या मेघमंडळाचे

वात्सल्य या गुणांचे। आई तुझ्यात साचे


गुंफूनि पूर्वजांच्या। मी गाइले गुणाला

साऱ्या सभाजनांनी। या वानिले कृतीला

आई! करावया तू। नाहीस कौतुकाला

या न्यूनतेमुळे ही। मज त्याज्य पुष्पमाला

पंचारती जनांची। ना तोषवी मनाला

परि जीव बालकाचा। तव कौतुका भुकेला


येशील तू घराला। परतून केधवा गे!

दवडू नको घडीला। ये ये निघून वेगे

हे गुंतले जिवाचे। पायी तुझ्याच धागे

कर्तव्य माऊलीचे। करण्यास येई वेगे

रुसणार मी न आता। जरि बोलशील रागे

ये रागवावयाही। परि येई येई वेगे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics