असे हे अतूट नाते..
असे हे अतूट नाते..


अतूट हे नाते असे
राखीने जोडले गेले..
बघता बघता दोन खोडकर मनांची
सुंदर गुंफण करुन गेले..
शांत ती बघताच
याने ही आपले शौर्य सुरू केले...
बघता बघता हे सारे
तिनेही युद्ध पुकारले...
खोडी काढून तिची तो
नेहमी तिला सतवत राही..,
पण वेळ आल्यावर पाठीशी तिच्या
खंबीर तो उभा राही...
जेवणाला तिच्या
वेगळीच अशी उपमा देई...
पण तिच्याच हातचे जेवण
तो आवडीने खात जाई...
जा गं जाडे, कोण रडेल तुझ्यासाठी
असे तो नेहमी बोले...
ती सासरी गेल्यावर मात्र
कोपऱ्यात तो रडत बसे...
आठवणींच्या गर्दीत मग
हळूच तो हरवून जाई...
हसू येई गाली त्याच्या
आठवून मस्ती ती ताईची...
भावा-बहिणीचे नातेच असे
शब्दात न मांडण्यासारखे...
घट्ट हे नाते असे
राखीतल्या मोत्यांसारखे...