तुझी ओढ..
तुझी ओढ..
का हे होते असे
आठवुनी तुला हसते मी..
हा हे होते असे
होऊनी भास तुझा
तुझ्यातच रमते मी..
का कळेना माझ्या मना
तुज़ेच हे वेड लागले जणू..
अल्लड स्वप्नात तुझ्या
उडे मनाचे हे पाखरु..
आठवुनी तुला रे
जगते नव्याने..
उमलले फुल हे
आपल्या प्रीतिचे..
तुझी ओढ स्वच्छंद
लागे जिवा
कसे सावरू मी
सांग ना वेड्या मना..

