ती मझी सोबतीण पावसातली..
ती मझी सोबतीण पावसातली..


येक पावसात सोबत असायची
माझ्या पावसाची पहिली भागीदार असायची
चिंब सरींचा आस्वाद घेताना
हळुच मला सावरत असायची
ट्रेनमधे चढताना पहिल
तिलाच जवळ घ्यायचो
या गर्दीतून वाट काढताना
तिला अलगद जवळ धरायचो
सोसायट्याच्या वा-यात जरा सावध रहायचो
ती जाऊ नये म्हणून तिला घट्ट धरुन ठेवायचो
तिच्याशिवाय प्रत्येक पावसाळा
अधुरा असायचा
पाउस आल्यावर पहिली
तिचीच आठवण यायची
तिच्याविना पावसाची
भितीच नाही वाटायची
काय करु ओ आता
तिच सोडुन गेली..
अशी ती सोबती माझी छत्रीच असायची..