वर्ष २०२०चे
वर्ष २०२०चे


वर्ष २०२० चे
होते नव्या आशांचे
पण ठरले ते नव्या संकटांचे..
एका पाठोपाठ
येत गेली अनेक वादळे..
देशाची ही दशा पाहून
कुणास कहीच न कळले..
कोरोनाचे हे चक्र
देशास बरखास्त करु लागले..
नाही नाही म्हणता
अनेकांचे आयुष्य संपवून गेले..
ही मुंबईची राणी(ट्रेन)
अचानक थांबली..
लोकांवर आता
पायी जाण्याची वेळ आली..
अचानक असे हे
चक्रीवादळ घोंघावले
अनेक खेडीपाडी
उद्ध्वस्त करुन गेले..
पाहता सारी संकटे
ही दुनियाही थबकली..
देशावर आता महामारीची वेळ आली..