बळीराजाची हाक..
बळीराजाची हाक..
1 min
23
या शिवराच्या मातीने
हाक अशी घातली
करपून गेल रानं
ओढ आम्हा तुझी लागली...
एक-एक पै जमवुन
बियाणही आणली
तुझ्याविना पावसा रं
माय माझी रुसली.
अन्नापाण्यावाचुन जाई
एक-एक दिस माझा
तूझ्या वाटकडचं रं
डोळे लाऊन बसलाय
हा शेतकरी तुझा..
आठवुन सारी कर्जे
डोळ्यात आसवं दाटली
फाटकी ही कापडंसुद्धा
मग माझ्यावरचं हासली..
तितक्यातच ऐकू आली
साद मला टिटवीची
तिलाही ओढ लागली
या पावसाची..
