STORYMIRROR

Varsha Bodh

Inspirational

0  

Varsha Bodh

Inspirational

आशेचा किरण

आशेचा किरण

1 min
1.2K


का उरी छेडली,तार ह्या मनाची..

धून बेसुर,ती या गंजल्या तनाची..


किती सोसले घाव,ह्या मनाचे..

तरी अंत नसे, दुःख यातनांचे..


खेळ नियतीने,कसा मांडला..

भावना दाटूनी, श्वास हा कोंडला..


मनीच्या भावना मनातच राहे..

ओठातील शब्द मागेच पाहे..


जरी अंतरीचे भाव, कुणास सांगावे

परक्याचे घरच वाटे, अती सोसावे


जिव्हाळ्याचे इथे, भेटच ना कुणी..

भिरभिरते मन, आतुरल्या नयनी..


छंद हा जगण्याचा पुढे नेत आहे..

अडचणीतून मार्ग,शोधते आहे..


सुखाच्या क्षणासाठी,मी जगते आहे...

आशेचा किरण,नभात बघते आहे...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational