STORYMIRROR

Priya Bhambure

Romance

3  

Priya Bhambure

Romance

मृदगंध पावसाचा द्वारा आयोजीत स्पर्धा 21 - कवितेचे शीर्षक-पागोळ्या गळतात ..

मृदगंध पावसाचा द्वारा आयोजीत स्पर्धा 21 - कवितेचे शीर्षक-पागोळ्या गळतात ..

1 min
277

चित्रविचित्र धुरकट ढगांच्या काजळलेल्या काळ्या कडा 

जणु चालतो ठुमकत ललना घेऊनी पाण्याचा घडा 

अक्राळविक्राळ ढगांचा अचानक आकाशात गडगडाट

 क्रुर नटखट विजेचा क्षणाक्षणात कडकडाट 

टप टप टप पाऊस फुलांचा अंगणी माझ्या वर्षाव झाला 

पाऊस सखा कुशीत धरणीच्या समाधानाने विसावला 

थंडगार वा-याच्या लाटेनेअंगअंगात रोमांच थरारले 

तुझ्या-माझ्या प्रेमाचे क्षण नकळत मनाला सुखावून गेले 


एकाच छत्रीतुन कधी फ़िरतांना पावसातुन चिंब भिजणे 

अस्पष्ट स्पर्शाच्या त्या जाणिवेने आजही मनाने शहारून जाणे 

थोडे भांडण, थोडा रुसवा तरीही ओढ पुन्हा प्रितीचीनाही

समजले खुळ्या मनालाही रे कसली रीत प्रीतीची 

तुझ्यासवे असतांना वेळेचे ही भान उरत नाही 

सोडून परत तुला मीलनाच्या घडीची मी वाट पाहत राही 


असे कसे आहे हे आपले बंधन सोडून गेलास तु मला 

तरीसुद्धा अजुनही अटकते माझे मन हे कळत नाही का तुला?

म्हणूनी सांगावसे वाटते आजही तुला,माझ्यासवे नसलास तरीही 

नेहमीच येतो हा पावसाळा दारावरती थाप देऊनीअश्रुंनी भिजवतो

मजला जीवनाच्या गर्द काळोख्यात आजही .....,पागोळ्या गळतात 

आणि तुझ्या - माझ्या प्रेमाच्या आठवणी दाटतात.. .....  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance