एक शिक्षक
एक शिक्षक
शिक्षक,
शिक्षक म्हणजे नक्की काय?
एका शब्दांत सांगुन समजला काय?
शिक्षक म्हणजे ज्ञानाचा असतो अथांग सागर
नेत असतो प्रत्येकाला आपल्या ध्येयाच्या किना-यावर
शिक्षक म्हणजे अपूर्णाला पूर्णत्वाचा लाभ देणारा
शब्दां, शब्दांतून ज्ञानाची अनुभूती देऊन जगवणारा
निस्वार्थ पणे करतो ही मिळालेली सरस्वतीची सेवा
आपण करायचे त्यांचे चीज हे सगळ्यांनी लक्षात ठेवा
आमचे शिक्षक म्हणजे आहेत आनंदाचा झरा जणु
भासतो आम्हांला मिळाला अनमोल हिरा नाव त्यांचे
आहे श्रीकांत किर्ती पोहोचो पूर्ण आसंमात मिळावी
अशी ज्ञानाची दीक्षा हीच आमच्या विद्यार्थ्यांची अपेक्षा
