दिवाळी आली
दिवाळी आली
दिवाळीचा सण आनंदाचा, मांगल्याचा,रांगोळीचा ,उटण्याचा,
दारात पणत्याआकाश कंदीलने दाही दिशा उजळवण्याचा
पाच दिवस असतात मानाचे सुरूवात होते वसूबारस दिनी
धनत्रयोदिशी,नरकचतुर्दशी होई धन,लक्ष्मी ची ह्या दिनी
पाडवा ,भाऊबीज वाढवतोदोन्ही नात्यांचा गोडवाम्हणतो,
वर्षभराचा आनंद फक्त मनामनांमध्ये साठवा
फराळाची असे रेलचेल रोजची सोबत अभ्यंगस्नानाची
मजा राही दररोजची सजली सगळीकडे रांग पणत्यांच्या दिव्यांची
मांगल्याने सजून येई दिवाळी अंधाराचे भय पुसून
प्रकाशाचे बीज रूजवे दिवाळी घरोघरी मन टाकेल उजळून
तुळशीच्या लग्नाच्या मुहूर्तावर होई दिवाळीची सांगता
ये परत असेच तु घेऊन आनंद हीच प्रार्थना सर्वांच्या मुखी आता
