STORYMIRROR

Priya Bhambure

Romance

3  

Priya Bhambure

Romance

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे

1 min
225

प्रेम म्हणजे प्रेम असत पण,सगळ्याचं ते सारखं नसत

 प्रेम म्हणजे प्रेम असतं अनेक धाग्याच्या नात्याने बांधलेलं असतं 

हळुवार,रेशमी स्पर्शाने ते जपावं लागत प्रेम म्हणजे प्रेम असतं

गुलाबाच्या फ़ुलाप्रमाणे सुगंधित असत

जीवन त्याने बहरून, फुलून जात

प्रेम म्हणजे प्रेम असतं नदीतील निर्मळ पाणी असत

वाहत रहातं ते अखंड जिकडे प्रवाह जात

प्रेम म्हणजे प्रेम असतं 

मुसळधार पावसात एकाच छत्रीत चालणं असत

दुसऱ्याला मुद्दामून विसर हे त्यातून सांगणं असत.

प्रेम म्हणजे प्रेम असतं दोघांचं सारखा वाटा असतो

पण,अर्धा नसून एक असतो प्रेम म्हणजे प्रेम असतं 

प्रेमाचा चार वाक्य कधीतरी त्या व्यक्तीवर रचून

त्याला गोडपणे ऐकवून खुश ठेवणं असत. 

प्रेम म्हणजे प्रेम असतं दोन जीवाचं मिलन असतं 

भेटीसाठी झालेले आतुर मन राहतं

म्हणून, प्रेम म्हणजे प्रेम असतं शब्दांत व्यक्त करण्यासारखं नसतं

अनेक जन्म निघून जातात पण, अर्थ त्यांचा नाही कळत

म्हणूनच म्हणतात,

प्रेम म्हणजे प्रेम असतं अनेक रहस्यांचं जाळ असत. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance