STORYMIRROR

Shweta Barkade

Romance

4  

Shweta Barkade

Romance

सख्या तू ये

सख्या तू ये

1 min
254

शब्दांना गुंफून गीत मी लिहिले

सूर त्यात मिळावया सख्या तू ये..!!


ओढ अंतरीची आसवांनाही कळली

त्यांना शांत कराया सख्या तू ये..!! 


मोगऱ्याच्या फुलांना सुगंधही येईना

त्यांना सुगंधीत कराया सख्या तू ये..!!


मनातील प्रेमाचे घर आपल्या ओसाड पडले

त्याला पुन्हा सजावया सख्या तू ये..!!


शब्दात तुझ्या मी रोजच हरवते

डोळ्यात तुझ्या हरावया सख्या तू ये..!!


अंगणातील कळीही आता पहिल्यासारखी उमलेना

तिला सुंदर उमलवया सख्या तू ये..!!


भेटितला विरह आता सहन होईना

प्रत्यक्षात भेटाया सख्या तू ये..!!

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance