STORYMIRROR

Shweta Barkade

Others

4  

Shweta Barkade

Others

प्रेमात मी पडले

प्रेमात मी पडले

1 min
380

कळलेच कुठे काही, न कळताच सारे घडले

प्रेम नव्हते करायचे, तरी प्रेमात मी पडले


दिसलेच कुठे काही, न दिसताच सारे दिसले

नव्हते जायचे मिठीत त्याच्या, तरी मिठीत जाऊन बसले


स्वप्न नव्हते काही, न झोपताच स्वप्न पाहिले

नसतानाही समोर तो, भास सतत त्याचेच होऊ लागले


समजत तर होते सगळे, पण समजून घेणे नाही जमले

त्याच्या मोकळ्या स्वभावावर, मी मात्र पूर्ण गुंतले


Rate this content
Log in