STORYMIRROR

Shweta Barkade

Romance

3  

Shweta Barkade

Romance

सख्या तुझ्याजवळ

सख्या तुझ्याजवळ

1 min
326

सख्या तुझ्याजवळ माझिया

आठवणींचे किती ओझे आहे

तू ये एकदा ते घेऊनी

कधीची मी वाट पाहते आहे


तुझे किनारी कित्येकदा

नाव मी रे घेतले आहे

तुला कधी ते ऐकू न आले

शब्दही अता मुके जाहले आहे


मनात माझ्या तूच सख्या रे 

तुझ्याविना कोणी दिसत नाही

तुला हे कधी न समजले

तुझेच नाव मी गोंदिले आहे..


तुला आलीच आठवण माझी

पुन्हा ये तू त्या जुन्या वाटेवरी

तुझ्यासाठी सदैव सख्या रे

मनाचे दार या खुले आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance