STORYMIRROR

आशिष अंबुले

Romance

4  

आशिष अंबुले

Romance

ओढ़ तुझी

ओढ़ तुझी

1 min
418

तुझ्या भेटीची ओढ़ 

प्रत्येक वेळी वाढत राहते,

सांगशील का ग राणी मला

असच नेहमी का होते?...


वेड्या मनाला माझ्या तुझ्याविना

काहीच सुचत नाही,

तू, अन फक्त तूच त्याच्याशिवाय

दुसरं काहीच दिसत नाही...


का तुझी ओढ़ इतकी

राणी, मला कळत नाही,

का तुझ्या आठवणीनेही

मन भरत नाही....


हातात हात असताना तुझा

दूर जावसं वाटत नाही,

सहवासाची ही तहान काही

केल्या भागत नाही...


अबोल ही प्रीत माझी

तुला कधीच कळत नाही,

अन् वेडं हे मन माझं

तुला पाहिल्याशिवाय राहत नाही...


तुझा मधूर आवाज

हृदयापलीकडे जातो,

तरी ऐकण्याची तृष्णा

मात्र भागत नाही....


वेडं मन माझ तुझ्या

आठवणीत झुरत राहतं,

तू येउन गेलीस तरी

तुझीच वाट पाहत राहतं...


आता क्षणाचाही दुरावा

सहन होत नाही मनाला,

आता अशक्य आहे जगणे

क्षणभरही तुझ्याविना....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance