पहिली भेट....
पहिली भेट....
तिची माझी पहिली भेट
झाली होती बाजारात,
तिला मी बघत राहिलो तेव्हा
ती आली होती थोड़ी रागात...
तिचा बाजारहाट झाला ती
तिथून निघून गेली,
मात्र माझी नजर तिला
एकटक पाहतच राहिली...
तिला बघण्याच्या नादात मी
बाजारच घेणं विसरलो,
मग घरी जाउन मी आईच्या
शिव्या खात बसलो...
खरच तिच्या नजरेत होती
खुप वेगळीच जादू,
मग मात्र मनात विचार पडले
तिला मी आता कुठे शोधू...
तिच्या त्या अदाकारी नजरेने
केले होते माझ्या हृदयावर वार,
तिची स्वप्न बघता बघता
वाहू लागली माझ्या आसवांची धार...
तिला शोधण्याच्या नादात मी
रोज बाजाराच्या फेऱ्या मारू लागलो,
जणू तिला बघण्यासाठी मी
वेडा पिसा होउ लागलो...
शेवटी मला ती एकदा अजून
बाजारात भेटली,
तेव्हा मात्र मी वेळ न घालवता
तिच्याकडे प्रेमाची मागणीच घातली....
