STORYMIRROR

आशिष अंबुले

Romance

3  

आशिष अंबुले

Romance

स्वप्न तुझे...

स्वप्न तुझे...

1 min
347

अप्सरेसम रूप तुझे

लुटून गेली काळीज माझे,

नयनी चकाकते स्वप्न तुझे

भरून जाते श्वास माझे...


कस्तुरीपरी गंध बहरलेय

मखमली श्वासात तुझे,

नक्षी रेखियली प्रेमकळ्यांची

हृदयी टोचती स्वप्न तुझे...


प्रीतीत धुंदमुग्ध करून

मज वेड लावले तुझे,

हृदयाच्या कुपीत डांबलेय

मधुगंधी स्वप्न तुझे...


मनाच्या हिंदोळ्यात तू 

स्वप्न झुलवून गेली तुझे,

नयनकड़ा भरल्या अश्रुंच्या

त्यात दिसे स्वप्न तुझे...


काहूरलेल्या सांजवेळी मज

स्वप्न पडती फक्त तुझे,

सांग सखे, साकार करशील

स्वप्नांचे शिखर माझे?..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance