STORYMIRROR

आशिष अंबुले

Others

4  

आशिष अंबुले

Others

कोरोना एक आपत्ती...

कोरोना एक आपत्ती...

1 min
571

घरातून बाहेर निघतांनी

वाटते कोरोनाची भीती,

आता काय सांगू राव तुम्हास

माझ्या दोन दिवसाची आपबीती..


घरात पडून पडून राहिल्या

मंदावली आर्थिक गती,

या कोरोनाच नाव एकूण

मारली गेली माणसाची मती...


शहराशहरात झाली आता

लॉकडाउन ची स्थिती,

चीनच्या युहान मधून आली

ही कोरोनाची भीती..


बंद पडली बाजारहाट

मंदावेल देशाची ख्याती,

नका करू राजनेत्यांनो

आता यावर तुमची राजनीती..


सरकारला सहकार्य करून

दूर करू कोरोनाची भीती,

मास्क, सेनीटायजरचा वापर 

करून मंद करू कोरोनाची गती..


शेयर मार्केटचा भाव पडला 

कमी झाली देशाची संपत्ती,

चीनमधून आली माझ्या देशात

कोरोना ही एक आपत्ती...


Rate this content
Log in