STORYMIRROR

आशिष अंबुले

Romance

4  

आशिष अंबुले

Romance

माझे प्रेम एकतर्फी नसावे...

माझे प्रेम एकतर्फी नसावे...

1 min
516

ती बोलत तर नाही

पण तिचे डोळे खुप बोलतात,

मी फक्त पाहत राहतो

पाय आपोआप तिच्याकडे वळतात...


सतत कसला तरी 

विचार करत असते,

काय माहीत तिच्या

मनात काय चालते....


हसतानाही ती खूप

कमी हसू पाहते,

पण हसताना तिच्या

गालावर खळी पड़ते...


तिच प्रेम मला हळूवार

ओढत नेत,

मला तिच्या प्रेमात हिरवळ

दिसत होती....


ती उभी असते तिथेच

कुठेतरी मी उभा राहतो,

ती जवळ नसली तरी

तिचा सहवास मला जाणवतो..


खरच भीती वाटते 

मला तिच्या जाण्याची,

पुन्हा माझ्या आयुष्यात

काळोख येण्याची....


ती आली होती प्रकाश

बनून माझ्या जीवनात,

आता जाणवतो सहवास

माझ्या हृदयाच्या स्पंदनात....


आता वाटते मला तिनेही

माझ्यावर प्रेम करावे,

तिच्यासाठी असलेले

माझे प्रेम एकतर्फी नसावे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance