हिरामुसलेल्या कातरवेळी
हिरामुसलेल्या कातरवेळी
हिरामुसलेल्या कातरवेळी
हिरामुसलेल्या कातरवेळी
इंद्रधनुनी किरणं व्हावं
सांगितले मी बकुळ फुलांना
त्या किरनांनी उजळून जावं
झुळझुळणाऱ्या मंद हवेनी
गंध कस्तुरी माखून यावं
खळखळणारे निर्मळ पाणी
अमृत होऊन बरसत राहावं
फुल पाकळ्या अंथरल्या मी
स्वप्नपरी तू अलगद यावं
सहज घेऊनि कवेत मजला
रम्य क्षणांना बंदिस्त करावं
तलमळलेले व्याकुळ हे तन
स्पर्शून तुजला तुजमय व्हावं
रंग केशरी किरणांना त्या
दव ओठ मी टिपत जावं

