STORYMIRROR

Santosh Pupalwad

Tragedy

3  

Santosh Pupalwad

Tragedy

अश्रू ने फुलव मळा ग!

अश्रू ने फुलव मळा ग!

1 min
118

पार करशील ग दुःखाच्या डोंगर,दऱ्या ग

बाई दुःखाच्या अश्रूने फुलव मळा ग


नभ फाटलं पाणी डोळ्यात

त्याच मिळणा मोल गावात

मन जळतया,मन सलतया 

 होऊन दिव्याची वात ग 

बाई दुःखाच्या अश्रूने फुलव मळा ग


तू अबला नाहीस नार

तुझ्या खांद्यावर समाद्यांचा भार

नको कोसळू ,नको ढासळू

चूल हृदयाच्या आगीन पेटव ग 

बाई दुःखाच्या अश्रूने फुलव मळा ग


घाम जिरवून भूमीत सारा

फोड दगडाला अंकुर थोडा

त्याच्या कृपेनं ,त्याच्या दयेन

होतील बाभळीच्या फुल बागा ग

बाई दुःखाच्या अश्रूने फुलव मळा ग


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy