ग्रेट तुझे प्रेम होते मना पासून
ग्रेट तुझे प्रेम होते मना पासून
कोणते मी शब्द वापरू
जे करतील तुला सुने
का वापरू माझे
तू भेदलेले काळीज जुने
जुन्या काळजाचा दाखला
कसा ठरेल 1 पुरावा नवा
पुरण्या वेदनेस ही लागतो आता
मर्मबंद नवा नवा
जुने पुराणे स्वप्न माझे
आजही आहेत नवे नवे
श्वासागणिक आठवणी अन
घाव ही नवे नवे
खूप शिताफीने पसरवलीस
तू जखमेवर तुझी दवा
चिघळलेल्या वेदनेस अता
तो तुझा ध्वनी पुन्हा हवा
खूप दूर आलो आता
तुझ्या आठवणींच्या गावापासून
आजही आस आहे तू म्हणावे
'ग्रेट तुझे प्रेम होते' - मना पासून
