विनंती
विनंती


देवा तुज एक विनंती ,
नको रे असा भयाण अंत कलियुगाचा !
नको असावा पापांच्या वणव्यात
मृत्यू पुण्याच्या निरागस मृगाचा
अमानुषतेची जाणवते रे झळ,
संस्कार का बनुनी गेले मृगजळ?
स्वार्थापोटी नाते चढले सुळावर
गुन्हे झाले आहे सर्वीकडे अनावर
भेदभावाच्या काट्यांमुळे एकतेचे पाय रक्तबंबाळ
पापांना उभारी देत का घिरटया घालतो काळ
का रे भोळ्या गाईला दुष्ट खाटकाचा मार
का सत्याच्या देहावर असत्याचे असह्य वार
का रे नराधमांचा इतका दरारा ?
अन्यायाच्या पुरात न्याय बुडाला सारा
पैशांच्या मागे का झाला मानव वेडापिसा ?
अशा घुसमटीत रे हा जीव श्वास घेणार कसा ?
तुज रे नाथा माझी हीच विनंती ,
आनंदाचे आक्रंदन असावे अंती...