STORYMIRROR

Om Dhake

Others

4  

Om Dhake

Others

कृष्णविवर

कृष्णविवर

1 min
217

मन हेच विविध रहस्यांचे अंतराळ !

विचारांचे ग्रह निरखून पाहण्यात घालवायचा काळ...

आठवणींच्या तारकांचे पुंज, ते किती 

छंद पाहता, दिसले अनेक कृष्णविवर...


मन हरखून घेणार आकर्षणाचा कृष्णविवर,

फुटतो मनात मोहाचा पाझर

भुरकन उडून जाते राहते मन

सर्व भावना का होता अनावर ?


असतो दिसणारा कधी निराशेचा कृष्णविवर!

दाटतो मनात दुःख व उदासीनतेचा कहर 

आशेची किरणे, गती कितीही असावी

क्षणातच होता त्या कृष्णविवरात लुप्त....


कुणा ध्यासप्रेमीचा ध्यासाचा कृष्णविवर

अडचणी अनंत, ध्यास पाहूनी धरी न धीर, 

विजय हाती, क्षण ते कितीही गंभीर 

ध्येयवेडयाला न कुठल्या संकटाची फिकीर 


मनात एका कोपर्यात आठवणींचा कृष्णविवर,

तिथे जाते खेचले मन झरझर 

वर्तमानाचा का वेळी पडतो विसर

आठवणींचा गोडवा जीवनात पेरतो का साखर?


Rate this content
Log in