तूच तू
तूच तू


स्वप्नातही तूच तू,
मनातही तूच तू
शब्दांची सय जडली मनात,
ती कविता तूच तू.....
शब्दांचा पडावा मनावर सडा,
साहित्यहारातला अनमोल खडा;
साहित्याच्या ताटातला तू विडा,
कविता लिहून झालो मनकवडा!
जुडले कविते,तुझ्याशी नाळ;
उडायला हवे शब्दांचे आभाळ,
गळ्यात हवी अलंकारांची माळ,
आरतीसाठी हवे यमकांचे पंचपाळ.
स्वप्नातही तूच तू,
मनातही तूच तू
शब्दांची सय जडली मनात,
ती कविता तूच तू.....
हळूच शब्दांत गुंफवून टाकते मनाला,
वाचताच तुला,काय होते भानाला?
लिहितो तुला प्रत्येक क्षणाला,
तुजसाठी जीव लावेलही पणाला!
शब्दांची सुमने, अलंकारांची बाग,
कधी शांती, कधी हास्य, कधी तळमळीची आग!
साहित्याच्या फुलांमधला तू पराग,
संगीतातला तू तन्मय राग.
स्वप्नातही तूच तू,
मनातही तूच तू
शब्दांची सय जडली मनात,
ती कविता तूच तू...