Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Om Dhake

Tragedy Others

4.8  

Om Dhake

Tragedy Others

आभास

आभास

1 min
274


दिगंतरात मावळला दीप

वाटतं तो काळ आला समीप 

चीरनिद्रेत जाईल तासनतास 

मनाला हा होतो आभास....


प्रकाशित अंगणात काळीभोर छाया 

नकळत जाणवते जीवनाच्या उत्तरार्धाची माया

उरली न मनात जगण्याची आस

मनाला हा होतो आभास....


लागलाय मनाला देवाचा ध्यास 

मनवेलीवर उत्तर नसलेल्या प्रश्नफुलांची आरास

क्षणभंगुर विचारांचा होईल नाश ,

मनाला हा होतो आभास.....


सौंदर्य न दिसे नयनांस 

आनंद न उमलते मनात, 

आराम न क्षणभराचा तनास, 

मनाला हा होतो आभास.....


न कुठली चिंता, न कुठले भय

जीवनाच्या संगीताला उरली नाही लय,

दुसर्यांना होऊ दे माझ्या शिवाय जगण्याची सवय,

मनाला हा होतो आभास......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy