Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Om Dhake

Others

4.7  

Om Dhake

Others

श्यामसुंदरा

श्यामसुंदरा

1 min
227


आपल्या नादात गुंग रे 

कसा तु श्यामसुंदरा ,

श्यामश्वेत खगांनी नटलेला 

कसा तु विशाल समिंदरा !


श्यामसुंदर क्षणांच्या सुमनांवरचे

वेचतो आनंदाचे पराग,

अंधारलेल्या भवनात पेटवतो 

श्यामसुंदर स्वानंदाचा चिराग


श्यामसुंदराच्या चरणी विसावली 

ती प्रेमळ व शांत गोमाय 

जणू त्याच्या किमयेने निसर्गावर

आणली सौंदर्याची साय 


श्यामसुंदराकडे धाव घेत

आहे उत्साही वासरी 

स्वछंद असे वाजवित 

आहे श्यामसुंदरा बासरी....


Rate this content
Log in