STORYMIRROR

Om Dhake

Fantasy

3  

Om Dhake

Fantasy

मी कोण?

मी कोण?

1 min
216

कलाकृतींमधला एक इवलासा टिंब 

हलकेच पानांवरून ओसरणारा दवाचा थेंब 

हिरवे दिलखुलास सळसळणारे पान

कोकीळेच्या गीतातली सर्वात सुरेल तान


समुद्राच्या भावनांचा तो खळखळाटाचा आवाज 

निळेशार नभातील शुभ्र चांदण्यांचा साज

प्राजक्ताच्या फुलांमध्ये उमलणारी कळी 

वेचून घ्यावीत अशी सुंदर बकुळी 


मी कोण? एक नभातील विहग

पंखांनी क्षितीजाकडे झेपावणारा, 

आनंदाच्या फुलपाखरामागे निरागस 

चिमुकला बाळ मी धावणारा 


आशेचे किरण शिंपडणारी सकाळ मी,

आनंदाने निरोप घेणारी रम्य संध्याकाळ मी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy