लुप्त
लुप्त


तान्हुल्याचे चांदोबा मामा निशा अंती
आभाळातून गायब कसे झाले ?
हिरव्या पानांवरचे दहिवराचे थेंब
उडताना कुणी का हो पाहिले?
पाने पिकल्यावर तो मोहक
हिरवा रंग कुठे विरघळून जातो?
तारका का त्या श्याम नभात
हळूच ढगांमध्ये हो हरवून जातात?
इंद्रधनुष्याची ती भुरळ घालणारी कमान
कुठे होऊन जाते हो लुप्त?
थेंब त्या अखंड समुद्रात कुठे
सापडतील,याचे रहस्य असावे गुप्त !
तुटणारा तारा तुटतो कसा, इच्छा
पूरी करणारा हा तारा विरतो कसा?
चंद्राच्या प्रतिमेतला तो काल्पनिक ससा
का नाही दिसत रे दिवसा ?
काव - काव करणार्या कावळ्यांची
कुठल्या झाडावरती भरते सभा?
झाडाला का नाही स्वतःचे
फळे खाण्याची कधी मुभा?
सगळे कसे होत राहता लुप्त...
रहस्य कसे राहते सदैव गुप्त...