STORYMIRROR

Om Dhake

Others

3  

Om Dhake

Others

नाद नाचरा

नाद नाचरा

1 min
255

सुगंधी सौरभाची दरवळ 

फुलला शुभ्रधवल मोगरा 

पिवळा बहरलेला बहावा पाहूनी 

मनी उमलला नाद नाचरा !


श्याम ढगांनी मेघाछन्न 

वाहता शीतल जलधारा 

थेंबांच्या सरींत भिजूनी 

मनी उमलला नाद नाचरा !


सुंदर लाल कळ्यांनी 

गच्च भरलेला पळस,

मधुमालतीच्या फुलांचे सौंदर्य पाहूनी 

मनी उमलला नाद नाचरा !


निशेत फुलली इवली रातराणी 

कुंदात ओवले श्वेत पुष्पमणी, 

तांबड्या कर्णफुलांनी सज्ज नागफणी पाहूनी 

मनी उमलला नाद नाचरा !


लाल पाकळ्यांमध्ये पिवळे पराग 

गणपतीला प्रिय असणारे जास्वंद ,

गोकर्ण पाहुनी व्हावे मन स्वच्छंद

असा उमलावा नाद नाचरा !


Rate this content
Log in