STORYMIRROR

Om Dhake

Fantasy

3  

Om Dhake

Fantasy

वेड

वेड

1 min
279

वाऱ्याला लागली तयाची चाहूल 

त्याच्या भानात होते नदीस दिशाभूल 

त्याच्या नादात कळीचे झाले फूल

तयामुळे आनंदित झाले, जे होते शोकाकुल...

त्याच्या नादात घड्याळाचे काटे मंदगतीने सरकले 

उत्साही मन त्याच्या तालावर थिरकले 


चिंताग्रस्त तयाच्या धुंदीत बुडाले 

त्याच्या नशेत पक्षी उंच उन्मुक्त उडाले 

त्याच्या संगतीत विसरून सारे दुःख 

सान्निध्यात त्याच्या वर्षावले सुख 

त्याच्या कुसुमातले चाखले वेडे मकरंद 

नवपल्लवित तरूस या वेडाचे कंद


तयाच्या नजरेत रसाला अमृताची चव 

त्याच्या प्रभावाने साठले पर्णावर दव,

त्याच्या संगीतात मोहक रव

उत्सवात त्याच्या सृष्टी भासे अभिनव....

प्रकाशात त्याच्या आनंदाचे किरण आले समीप, 

वेडाच्या वातीने प्रज्वलित केले आनंददीप 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy