गुंततो जीव सखे..
गुंततो जीव सखे..


मिटुनी लोचने तू ये माझ्या मिठीत ।
अशी राहू दे मजला तुझ्या कुशीत ।। धृ।।
गंधाळली गर्द निशा धुंद या आसमंती ।
मदन समीर मंद वाहे रातराणी सोबती ।।१।।
उठे तप्त रोमांच यामिनी माझे या तनूत ।
बहर तू अलवार जसा साद मंजुळ वेणूत ।।२।।
गुंततो जीव सखे रेशमी मोकळ्या केसात ।
मखमली स्पर्श सुगंधी भिडे हा काळजात ।।३।।
थरथर ही मम हृदयात ठेव तुझा असा हात ।
फुलू दे मधुर मिलन आहे तरुण ही रात।।४।।
शांत होई मन साजणी तव मलमली अधरात ।
विसावा मिळे क्षणोक्षणी इथे चिर निवांत ।।५।।
बांधूनी पाश घे हळूवार मला तुझे कवेत ।
होऊ दे बिलगुनी प्रेम पहाट मस्त या नशेत ।।६।।