बालमन
बालमन
1 min
655
कसे सांगू तुला सांग ना ग आई
शाळेत जायला आवडत नाही
अंक बाराखडी गाणी अन गोष्टी
एवढीच आहे बालकांची सृष्टी
असे जर तुम्हा असेल वाटत
मला नाही बुवा म्हणणे पटत
दप्तराचे ओझे अभ्यासाचा ताण
इवल्याशा जीवाला थोडेतरी जाण
आईबाबा तुम्ही सांगावे खरेखरे
बंदिस्त इतके कधी होता बरे
प्रेस्टीज तुमची उंचावण्यासाठी
क्लासेसची ब्याद उगा आमच्यापाठी
जगू द्या ना मुक्त स्वच्छंदीपणे
बालपण गेले पुन्हा नाही येणे
