पालकनीती
पालकनीती
आजकालची पालकनीती पाहुन
आश्चर्य मला वाटते
आपल्याच लेकरांवर एक ना अनेक
क्लासेसचे ओझे लादते ...
पहिल्यासारखं आता कुठं
काहीच नाही दिसत
कोणतच लेकरू मायबापाजवळ
घटकाभर नाही बसत ...
हासू हारपले चेह-यावरचे
तरूण झाले वृध्द
धाव धाव धावतात नुसते
जणू जगण्यासाठीचे युध्द ...
नाही तो लडिवाळ आता
ना स्पर्श मायेचा लाभत
व्यवहारी झाले जग सारे
कोणी आपुलकीने नाही वागत ...
वृध्दाश्रमांची वाढली संख्या
आजीआजोबा दिसेनात आता
कोण सांगेन नातवंडांना
शिवबाच्या प्रेरणादायी गाथा...
