STORYMIRROR

Kshitija Pimpale

Inspirational

4  

Kshitija Pimpale

Inspirational

भुतकाळ विसरून आता जगावे

भुतकाळ विसरून आता जगावे

1 min
327

भुतकाळ आठवुन खुश व्हावे

असेही काही नाही

वर्तमानात तर जगावेसे

मुळीच वाटत नाही .....


आता वाटते ढगांच्या

पंखावर स्वार व्हावे

पक्षांसम स्वैर उडूनी

नभोमंडळ फिरूनी यावे .....


खुप झाले रडून आता

सुंदर जीवनगाणे गावे

सोडूनी चिंता व्याधी अलिकडे

पलिकडे जाऊन पहावे .....


भेटतील कदाचित क्षण सुखाचे

सारे अलगद वेचून घ्यावे

आयुष्याच्या सायंकाळी

थोडे जगून घ्यावे ......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational