आठवण
आठवण
आठवणीचं नसत्या
तर किती बरे झाले असते.
कुणी कधीच कुणावर
कशासाठी च रुसले नसते.
विसरभोळा म्हणून कुणी
कधी कुणावर हसले नसते
कपटी कारस्थानात कुणाच्या
कुणी कधीच फसले नसते.
रोज नवीन दिवस घेऊन
सारे जग उठले असते.
कुणी कधी कुणासाठी
एकदाही झुरले नसते.
कुणाचेही डोळे
कधी कध्धीच भरले नसते.
