चॉकलेटचा बंगला (बाल काव्य)
चॉकलेटचा बंगला (बाल काव्य)
1 min
24.1K
स्वप्नात मिळाली मला
चॉकलेट ची कार
त्याला बिस्कीटची
चाकं चार
चॉकलेटच्या कारमध्ये
बसून निघाली स्वारी
थांबवली माझ्या
चॉकलेटच्या बंगल्यादारी
बंगल्याला माझ्
लिम्लेटचे कुंपण
बंगल्यावर शोभे
Five स्टार चे तोरण
kit kat च्या अंगणात
Perk चे झाडं
त्याला लागली
चॉकलेट फार
बेडरूम ला माझ्या
Dairy मिल्क ची भिंत
छता ला शोभे
Milky बार मस्त
असा हा माझा
चॉकलेट चा बंगला
तुम्हाला पाहायला
आवडेल का सांगा
