व्यायाम
व्यायाम
1 min
455
चला मुलांनो चला चला
नित्य व्यायाम करू चला....
दोन हात गोल गोल फिरवूया
खांद्यांचा व्यायाम आपण करूया...
कर ठेवू कटीवरी उड्या मारूया
सर्वांग सुंदर असा व्यायाम करूया....
सूर्यनमस्कार बारा तरी घालूया
आपली पचनशक्ती छान सुधारूया....
श्वसनाचा भ्रामरी प्राणायाम करूया
स्वतःची स्मरणशक्ती आपण वाढवूया....
अनुलोम विलोम श्वसन प्रकार करूया
मानसिक शांतता आपण मिळवूया...
