निसर्ग
निसर्ग
1 min
4
निसर्ग...
झऱ्याची झुळझुळ
पानांची सळसळ...
भुंग्यांचा गुंजारव
चिमण्यांची चिव चिव...
निसर्गाचे हे गाणे
कितीतरी लोभसवाणे
वेळ काढू आवर्जून
आपल्याच कामातून...
ऐकूया सृष्टीचा नाद
घालूनी त्यालाच साद....
धरणी पावसात सजते
हिरवा शालू पांघरते...
निसर्गात रमू निवांतपणे
आनंदी होवू त्याच्या संगतीने...
आपले मन प्रसन्न करूया
निसर्गाची काळजी घेऊया...
वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जिल्हा -पुणे
मो. नं. 9823582116
